हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

जीवघेणे सूक्ष्मजीव

By- Paresh Chitnis

अमेरिकेवर २००१ साली ११ सप्टेंबर चा हल्ला झाला. २९७७ लोकांचा बळी गेला आणि जगात भीतीची लाट पसरली. या धक्क्यातून अमेरिका सावरत नाही तोच एका आठवड्यानी म्हणजे १८ सप्टेंबर २००१ पासून नवीनच घातसत्र सुरू झालं. अमेरिकी पोस्टाने मीडिया कंपन्यांना व दोन मंत्र्यांना पत्र आली ज्यात एक पांढरी पाउडर होती. या पाउडर मुळे पाच लोकांचा मृत्यू झाला आणि १७ लोकं बाधित झाली.

ही पांढरी पाउडर अँथ्रॅक्स जिवाणूचे स्पोर्स होते. अँथ्रॅक्स जिवाणूंचा वापर या पद्धतीने घातपात करायला होऊ शकतो ही कल्पना कुणालाच नव्हती. अँथ्रॅक्स जिवाणू मातीत किंवा पाण्यातून जैविक शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकतात याचा अंदाज अमेरिकी सैन्याच्या शास्त्रज्ञांना होता. पण पाउडर रुपात अँथ्रॅक्सचा वापर केला जातोय हे पाहून अल कायदाची भीती अधिकच बळावली. अमेरिकी तपास यंत्रणा एफबीआय ने केलेला हा सर्वात क्लिष्ट तपास आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अँथ्रॅक्स पाउडरच्या जनुकीय चाचण्या केल्यानंतर असे लक्षात आले की तो जिवाणू अमेरिकेच्या सैन्य संशोधन प्रयोगशाळेतला आहे. डॉक्टर ब्रूस एडवर्डस आयविनस या शास्त्रज्ञाने हे केले होते असा निष्कर्ष एफबीआय ने काढला होता. न्यायालयाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी डॉक्टर आयविनसने २००८ साली आत्महत्या केली. 

जैविक शस्त्र म्हणून जिवाणू विषाणू व ईतर सूक्ष्म जंतूंचा वापर केला जाऊ शकतो. या भीतीने संरक्षण क्षेत्रात अश्या जैविक हल्ल्याची रोकथांब कशी करावी यासाठी अभ्यास केला जातो. जगात बाराशे सुक्ष्म जिवांची माहिती उपलब्ध आहे ज्यांचा वापर जैविक हल्ला करण्यासाठी जैविक शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो. 

अँथ्रॅक्स नंतर बाॅटूलिनम सगळ्यात घातक जिवाणू ठरू शकतो. एक ग्राम बाॅटूलिनम टॉक्सिन दहा लाख लोकांचा जीव घेऊ शकतो. जपानने युद्धातल्या बंदी सैनिकांवर मंचुरीया, चायना येथे याचा प्रयोग करून पाहिला होता.

जर्मनी युद्धात बाॅटूलिनम टॉक्सिनचा वापर करेल या भीतीने अमेरिकेने आपल्या सैनिकांसाठी यावर लस निर्माण केली होती. इराकने १९९१ साली बाॅटूलिनम टॉक्सिन प्रोजेक्ट करत असल्याचा खुलासा संयुक्त राष्ट्र कडे केला होता. उत्तर कोरिया, इराण, इराक व सिरीया ज्या चारही देशांना अमेरिका आतंकवाद समर्थक देश म्हणते त्या सगळ्यांकडे बाॅटूलिनम टॉक्सिन प्रोजेक्ट जैविक हल्ल्यासाठी केले गेले आहेत. बाॅटूलिनम टॉक्सिन हे क्लॉस्ट्रीडीयम बाॅटूलिनम नावाच्या सुक्ष्म जिवाणू पासून बनविले जाते. क्लॉस्ट्रीडीयम बाॅटूलिनम हा बॅक्टेरिया दुर्मिळ असतो. त्याचा नैसर्गिक संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते. त्याचा भाऊ म्हणावा असा जिवाणू म्हणजे आपल्या ओळखीतला टिटॅनसचा बॅक्टेरिया क्लॉस्ट्रीडीयम टिटॅनी. टिटॅनस सारखाच बाॅटूलिनम टॉक्सिन ही स्नायूंचे आकुंचन करून घातक ठरतो.

जिवाणूंपेक्षाही सूक्ष्म विषाणू असतात. कांजीण्या हा आजार भारतात परिचित आहे. वॅरीओला विषाणू हा कांजीण्यांचा कारक आहे. अमेरिकेने अमेरिकेतील मूळ निवासी अमेरिकन लोकांवर याचा वापर केला याचे पुरावे आहेत. रशियाने १९८० मध्ये जैविक शस्त्र म्हणुन वॅरीओला विषाणूंची प्रयोगशाळेत पैदास केली होती. १९६७ साली या आजारावर लस बाजारात आल्यानंतर यावरील जैविक युद्धासाठी संशोधन कमी झाले कारण त्याचा धोकाही कमी झाला.

फ्रांसिसेला ट्यूलरेनसिस हा जिवाणू ट्यूलरेमिया आजार पसरवतो. यात अंगावर फोड येणे, ताप, खोकला, जुलाब अशी लक्षणे दिसतात व मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते. 

सोविएत रेड आर्मी ने याचा वापर जर्मनी च्या सैन्यावर स्टेलिंग्रॅडच्या युद्धात दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी केला होता. 

ईबोला वायरस कोंगो देशात सर्वप्रथम सापडला. जंगली प्राण्यांकडून मानवात आलेला हा वायरस अतिशय घातक आहे. पन्नास टक्के केसेस मध्ये मृत्यु होतो. जैविक शस्त्र म्हणून हा वायरस अगदी योग्य असू शकतो. सोविएत संघाने १९८६ ते १९९० मध्ये पंच वार्षिक योजना आखून यावर संशोधन केले होते पण त्याचा वापर केल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. 

येरसिनीया पेस्टीस हा बॅक्टेरिया प्लेगची महामारी यासाठी कारणीभूत आहे. उंदरांमधून मानवात संसर्ग होऊ शकणारा हा बॅक्टेरिया जैविक शस्त्र म्हणून वापरण्यास पात्र ठरतो. चौदाव्या शतकापासून याचा वापर युद्धात केला जातोय. जपानने दुसर्‍या महायुद्धात चीन व मनचुरीया वर येरसिनीया पेस्टीस ची लागण केलेल्या उंदरांचा वर्षाव केला होता. सोविएत वैज्ञानिकांनी १९८० मध्ये अ‍ॅण्टीबायोटिकला ही न जुमानणारे येरसिनीया पेस्टीस जैविक शस्त्र म्हणून तयार केले होते. त्यांनी मारबर्ग वियरस हवेत पसरवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. हा विषाणू ९० टक्के केसेस मध्ये मृत्यु घडवून आणू शकतो. 

कोरियाच्या युद्धात तीन हजार अमेरिकी व कोरियाई सैनिक हांटा वायरसने बाधित झाले होते. मात्र त्याचा वापर जैविक शस्त्र म्हणुन केला होता की नैसर्गिक बाधा झाली होती हे कळू शकले नाही. हांटा वायरस हा बुनियाविरीडे या परिवारातील तीन वायरस पैकी एक आहे. उंदीर व ईतर प्राण्यांमध्ये सामान्यपणे असलेला हा विषाणू मनुष्यात येऊ शकतो. नुकतेच चीन मध्ये एक मृत्यु हांटा वायरस मुळे झाल्याची बातमी होती. 

अफ्लाटाॅक्सीन हे तर बूर्शी पासून बनवलेले जैविक शस्त्र आहे. याबद्दल मी एक पूर्ण लेख आधी लिहिला आहे. गल्फ युद्धात त्याचा वापर झाला होता. 

जैविक युद्धात शस्त्र म्हणुन वापरले जाऊ शकतात असे सर्व विषाणू जिवाणू व त्यांचे जैविक पदार्थ यांचे उत्पादन साठा व वाताहात करणे गुन्हा ठरवला गेला आहे. कायद्याने यावर बंदी घातली जाते. 

जैविक शस्त्र जितके घातक असेल तितके चांगले. रंग विरहित, गंधविरहित चव नसलेला घातक जैविक पदार्थ अजूनच चांगला मानला जातो. 

सध्या तुम्हाला घरात बसवणारा कोरोना वायरस यामुळे मृत्यूची शक्यता कमी आहे मात्र त्याचा फैलाव खूप लवकर होतो. जैविक शस्त्र म्हणुन याचा वापर मृत्यू घडवून आणण्यासाठी नाही तर भय निर्माण करून देशांना व लोकांना वेठीस धरण्यास केला जाऊ शकतो. चीनने जगाला दिलेला हा वायरस दोन टक्के केसेस मध्ये घातक असू शकतो. हा जर जैविक शस्त्र म्हणुन चीनने पसरवला असेल तर चीनने जैविक युद्धाची व्याख्या बदलली आहे असे म्हणावे लागेल. 

 

CPAG

Popular Posts