हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

आत्महत्या की हत्या?

By- Paresh Chitnis

या प्रश्नाचं उत्तर न्याय सहाय्यक विज्ञान तज्ञ पुराव्यांच्या आधाराने देऊ शकतो. आत्महत्या हे जगातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांचे मृत्यूचे द्वितीय क्रमांकाचे कारण आहे. आत्महत्या करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरलेले माध्यम म्हणजे कीटकनाशक पीणे व गळफास घेणे. ज्या व्यक्तिने आत्महत्येचा प्रयत्न आधी केला आहे अशी व्यक्ति पुन्हा आत्महत्या करण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. 

आत्महत्येला सहसा कोणी साक्षीदार नसतो. ८५% आत्महत्येच्या घटनांमध्ये कुठलेही पत्र किंवा सुसाइड नोट लिहिलेली नसते. सुसाइड नोट आणि शेवटचा पत्रव्यवहार यात फरक आहे. एखादी व्यक्ती रोज डायरी लिहीत असेल तर तिचे डायरीचे शेवटचे लिहिलेले पान नेहमीच सुसाइड नोट असेल असे नाही. सुसाइड नोट ही त्या कृत्याबद्दल व अगदी त्या कृत्यच्या आधी लिहिलेली असते. बहुतांश वेळा सुसाइड नोट ही मोजक्या शब्दात अगदी दोन ओळीत आटोपती घेतली असते. 

कधी कधी हे पत्र खूप मोठं असतं. मात्र पत्रात जिथे आत्महत्येच्या कृतीबद्दल लिहिलेले असते तिथे हस्ताक्षर विशिष्ट पद्धतीचे दिसून येते. 

सुसाइड नोट खरी आहे की कोणी इतरांनी लिहून हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे का ही शंका दूर करणे महत्त्वाचे असते.

हस्ताक्षर तज्ञांच्या मते सुसाइड नोट मध्ये काही विशिष्ट पद्धतीचे हस्ताक्षराचे पुरावे दिसून येतात. सुसाइड नोटच्या शेवटच्या ओळीचे शेवटचे शब्द हे खाली जाताना दिसतात. सगळ्या आशा सोडून दिल्याची मानसिक स्थिती या हस्ताक्षराच्या प्रकारावरुन समजून येते.

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात पत्र मोठे होते पण एका पानाच्या शेवटी जिथे आत्महत्येचा उल्लेख येतो तिथे त्याचे हस्ताक्षर खाली जाताना दिसते. तेव्हा ही आत्महत्याच होती यात शंका नाही. कोणीही असे पत्र नंतर लिहिले तर त्याच्या हस्ताक्षरात असे दिसणार नाही. 

हस्ताक्षर मानसिक परिस्थिती प्रमाणे बदलते व त्यामुळे खरी सुसाइड नोट ओळखणे शक्य होऊ शकते. 

कॅफे कॉफी डे चे मालक सिद्धार्थ यांनी टाइप केलेली सुसाइड नोट मागे सोडली त्यामुळे त्यांची फक्त स्वाक्षरी त्यात दिसू शकली. अश्यावेळी डिजिटल फोरेन्सिक तज्ञ हे पत्र कुठल्या संगणकावर व कधी टाइप केल गेलं कोणत्या प्रिंटर वर त्याची प्रिंट काढली गेली इत्यादी पुरावे शोधू शकतात. 

डिप्रेशन या मानसिक परिस्थितीमध्ये असताना आत्महत्येची शक्यता खूप जास्त असते. हताश होऊन लोक हा पर्याय निवडतात. 

आत्महत्या करणार्‍या प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षरी मध्ये काही साम्य दिसून आले आहे. हस्ताक्षर तज्ञांच्या मते खाली उतरणारी स्वाक्षरी ही स्वतःला संपवायचे विचार दर्शवणारी स्वाक्षरी असते. नेपोलियनने त्याच्या आयुष्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचे राज्य, बायको, मुलं, अनुयायी सगळेच गेल्यावर तो हताश झाला होता. 

मार्क ट्वेन नावाच्या प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने ही आत्महत्येचे समर्थन केले. त्याचे व्यक्तिमत्व ही असेच उदासीन झाले होते. हुकूमशहा हिटलर, इंग्रजी साहित्यिक ऑस्कर वाइल्ड यांच्या सह्या देखील खाली जाणार्‍या होत्या.

कोडॅक कंपनीचा मालक ईस्टमन याने सहा शब्दांची सुसाइड नोट लिहिली व आत्महत्या केली. त्याची स्वाक्षरी देखील खाली जाणारी होती. 

गळफास घेऊन आत्महत्या केली असेल तर शवविच्छेदन किंवा पोस्टमॉर्टेम मध्ये काही विशिष्ट पुरावे सापडतात. हत्येच्या बाबतीत त्या खुणा दिसून येत नाहीत. 

हाताची नस कापून आत्महत्या करणारी व्यक्ति बरेचदा (पण नेहमीच नाही) आधी हलके घाव करून नंतर एक शेवटचा खोल घाव करते. 

उजवा हात जास्त वापरणारा व्यक्ति सहाजिकच उजव्या हाताने डाव्या हाताची नस कापून आत्महत्या करेल. अश्या व्यक्तीच्या उजव्या हातावर घाव असेल तर शंकेला जागा निर्माण होते. 

प्रगत देशात किंवा श्रीमंत व्यक्ति बंदूकीची गोळी डोक्यात घालून आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. दुरून मारलेली गोळी व डोक्याला जवळून मारलेली गोळी ही वेगळ्या प्रकारे शरीरात शिरते. शवविच्छेदन करताना हे समजू शकते. 

आत्महत्या हे समस्येचे समाधान नाही. स्वतःला संपविल्यावर प्रश्न सुटत नाही, प्रश्न निर्माण नक्कीच होतात. 

CPAG

Popular Posts