हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

बाप शोधण्याची चाचणी

By- Paresh Chitnis

जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलिनच्या आयुष्यात त्याच्या तिसर्‍या बायकोशी विवाहित असताना जोआन बेरी नावाची  प्रेयसी १९४१ साली आली. चार्लीच्या कारकिर्दीला तिच्यामुळे उतरण लागेल याचा त्याला किंचितही अंदाज नव्हता. त्याने तिला १९४२ मध्ये ट्रेन तिकीट काढून दिले व आपल्या शहरात बोलावले. नऊ महिन्यांनंतर बेरी हिने एका मुलीला जन्म दिला व चार्लीच तिचा बाप असल्याचा दावा केला. पुढे हे प्रकरण १९४४—४५ मध्ये कोर्टात गेले.

त्याकाळी आजच्या सारखे डीएनए टेस्टिंग वगैरे नव्हते. पितृत्व सिद्ध करण्यासाठी रक्त चाचणीचा पर्याय होता. तीन स्वतंत्र तपासण्यांच्या मते चार्ली त्या मुलीचा पिता असू शकत नाही असे समजले. चार्लीचा रक्त गट ए होता, बेरीचा ओ होता त्यांना बी रक्त गटाचे अपत्य होणे शक्य नव्हते. 
मात्र रक्त तपासणीला कॅलिफोर्निया कोर्ट  पुरावा ग्राह्य धरत नसे. चार्लीला त्या मुलीचा सगळा खर्च द्यावा लागला.
त्यावेळी तो त्याच्या चौथ्या पत्नीशी विवाहित होता.
कायदा रक्त तपासणीला पुरावा ग्राह्य धरत नसल्याने त्याला खूप अवहेलना सहन करावी लागली. अमेरिकेत त्याला प्रवेश नाकारला गेला. त्यानेही शपथ घेतली की पुन्हा अमेरिकेत येणार नाही. मात्र नंतर चार्ली  चॅपलिन त्यानंतर एकदाच अमेरिकेत गेला तेही ऑस्कर पुरस्कार स्विकारण्यासाठी.
या व अशा काही प्रकरणांमुळे पुढे रक्त तपासणीला पितृत्व तपासण्यासाठी मान्यता मिळाली.
आज डीएनए चाचणी करून पितृत्व किंवा मातृत्व सिद्ध करता येऊ शकतं.
डीएनए चाचणी चा उपयोग गुन्ह्याचा तपास करण्यात होतो. घटनास्थळी सापडलेले जैविक पुरावे जसे की रक्त, थुंकी, दात, केस या सगळ्यातून व्यक्तींची ओळख पटवता येऊ शकते. सर्व मनुष्यांचा ९९ टक्क्यांपेक्षा अधिक डीएनए सारखा असतो. उर्वरित डीएनए मधील विशिष्टता व्यक्तिला ओळखण्यास पुरेशी आहे.
भारतात खूपच चर्चेत आलेले पितृत्वाचे प्रकरण म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेते एन डी तिवारी व रोहित शेखर यांचा वाद. रोहित शेखर ने एन डी तिवारी हे आपले वडील असल्याचा दावा केला होता. कित्येक वर्षे कोर्टात लढा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तिवारी यांना डीएनए चाचणी करायला लावली व  चाचणीचा निकाल रोहित  शेखर यांच्या बाजूने लागला.

डीएनए चाचणी ही गोपनीयतेच्या मानावी अधिकाराविरुद्ध किंवा खासगी जीवनाच्या हक्का विरुद्ध आहे असे म्हंटले जाते. डीएनए चाचणी च्या निकालांमुळे कुणाचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते त्यामुळे डीएनए चाचणी करावी की नाही हे कोर्ट विचारपूर्वक ठरवते.
घरच्याघरी ही चाचणी करण्याचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. मात्र असल्या चाचणीचे निकाल कोर्टात ग्राह्य धरले जात नाही.

CPAG

Popular Posts