हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

ब्लॅक लाईट

By- Paresh Chitnis

गुन्हेगार हुशार होता. गुन्हा केल्यानंतर त्याने गुन्ह्याचा कुठलाही मागमूस मागे सोडला नव्हता. घटनास्थळी गेल्यावर तिथे काही घडले असेल असे वाटत ही नव्हते. 

सर्व वस्तू जागच्याजागी होत्या. तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी एक टॉर्च लावला व पूर्ण अंधार करून टॉर्च फर्शीवर सगळीकडे फिरवला. त्यांना तिथे काही डाग दिसले जे डोळ्याला साधारणपणे दिसत नव्हते. हा दुवा त्यांना शोध घेण्यासाठी उपयोगात येणार होता.

पांढरा प्रकाश हा सात रंगांच्या मिश्रणाने बनलेला असतो असे आपल्याला माहीत आहे. हे सात रंग मानावी डोळ्याला दिसतात. मानावी नजरेला न दिसणार्‍या प्रकाश किरणांच एक वेगळच विश्व आहे. यू. वी. लाईट हा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मात्र बरेच पदार्थ असे असतात जे यू. वी. लाईट पडल्यावर विशिष्ट प्रकारचा प्रकाश लहरी निर्माण करतात ज्या आपल्याला दिसतात.

यू. वी. लाईटला ब्लॅक लाईट असेही म्हणतात. यू वी लाईटचा स्त्रोत जर थोडा मानावी नजरेला दिसणारा उजेड ही पाडत असेल तर आपल्याला तो जांभळा दिसतो. मात्र फक्त आणि फक्त यू वी किरण उत्सर्जित करणारा स्त्रोत असेल तर आपल्या डोळ्यांना काहीही दिसत नाही. म्हणुन त्याला ब्लॅक लाईट म्हणतात. 

गुन्ह्याचा तपास करीत असताना डोळ्याला न दिसणारे पुरावे ब्लॅक लाईट मध्ये दिसतात. दात, केस, लघवी, वीर्य हे पदार्थ ब्लॅक लाईट मध्ये दिसतील असे प्रकाश किरण उत्सर्जित करतात. काही पदार्थांवर विशिष्ट रासायन पडले तर ते ब्लॅक लाईट मध्ये दिसू लागतात. रक्त ब्लॅक लाईट मध्ये दिसून येत नाही. लुमिनाॅल सारखे रसायन स्प्रे केल्यावर त्याच्याशी प्रक्रिया होऊन ब्लॅक लाईट मध्ये चमकू लागते. फ्लोरोसंस या प्रक्रियेमुळे आपल्याला ब्लॅक लाईट वापरता येतो.

चित्रपटात किंवा सिरियल मध्ये दाखवतात की पोलिस निळा टॉर्च मारतात आणि त्यांना लाल रक्त दिसतं. असं होत नाही. रक्त ब्लॅक लाईट मारल्याने लगेच दिसत नाही. रसायनाचा स्प्रे घटनास्थळी शिंपडावा लागतो आधी. 

१९८० पासून ब्लॅक लाईटचा उपयोग फोरेन्सिक मध्ये वाढला. हातात घेऊन फिरता येईल असे टॉर्च निर्माण झाल्याने घटनास्थळी तपासकार्यात त्याचा ऊपयोग सोपा झाला. 

चलनाच्या नोटा खर्या आहेत की खोट्या हे तपासायला ब्लॅक लाईटचा वापर होतो. पासपोर्ट, बॉन्ड पेपर, इत्यादी डॉक्युमेंट्सची पडताळणी ब्लॅक लाईटने केली जाते.

तुम्ही जंगलात रात्रीचे फिरत असाल तर एक ब्लॅक लाईट टॉर्च नक्कीच जवळ ठेवा. जमिनीवर ब्लॅक लाईट फिरवला आणि तिथे विंचू असेल तर तो निळ्या प्रकाशने उजळून निघेल. विंचवाच्या शरीरातील प्रथिने ब्लॅक लाईट मध्ये फ्लोरोसंस निर्माण करतात. ब्लॅक लाईट शरीराला घातक ठरू शकतो त्यामुळे त्याचा वापर जपून केला पाहिजे. 

 

CPAG

Popular Posts