हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

विषाची परीक्षा

By- Paresh Chitnis

ईवा हिटलर ही अॅडाॅल्फ हिटलरची चौदा वर्षांची सहचारिणी व चाळीस तासांपेक्षा कमी काळाची पत्नी. विवाह होताच काही वेळात ईवा हिटलर व अॅडाॅल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. ईवा हिटलरने सायनाईड खाऊन मृत्यूला कवटाळले. तीने यापुर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सायनाईडचा परिणाम त्वरित होतो. कमीतकमी त्रास होऊन व्यक्तिचा मृत्यू होतो. 

 दुसर्‍या विश्वयुद्धात जर्मनी गुप्त पत्रव्यवहार करण्यासाठी एनिग्मा मशीन द्वारे संदेश गुप्त सांकेतिक भाषेत रुपांतरीत करत असे. आज या प्रणालीला आपण एनक्रीपशन असे म्हणतो. ब्रिटनच्या गुप्तचर खात्यासाठी अॅलन ट्यूरिंग हा काम करत असे. अॅलन ट्यूरिंग एनिग्मा मशीनने बनवलेली सांकेतिक भाषा उलगडून संदेश वाचण्यासाठी कोड शोधत असे. तो एक गणितज्ञ होता.  त्याने ट्यूरिंग मशीन बनविले होते जे कुठल्याही सांकेतिक संदेशाचा कोड शोधू शकेल. त्या काळातला तो आघाडीचा सायफर अॅनॅलिस्ट होता. आज कदाचित आपण त्याला हॅकर म्हटले असते. 

 जर्मनी कडून ब्रिटनच्या अश्या शास्त्रज्ञांना धोका होता. त्याने ही गोपनीय कामगिरी गोपनीय ठेवणे महत्त्वाचे होते. ब्रिटनचे सांकेतिक कोड उलगडण्याचे हे यश जर्मनीला समजले तर ते खूप नुकसानकारक होईल.

 एके दिवशी सकाळी अॅलन ट्यूरिंग त्याच्या शयनकक्षात मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शेजारी अर्धवट खाल्लेले सफरचंद होते. पोस्टमॉर्टेम केल्यावर त्याला सायनाईडची विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने आत्महत्या केली असावी असे सांगितले गेले. त्याच्या मृत्यूचे कारण नक्की समजू शकले नाही.

 विष प्रयोग करून मारल्याचे सिद्ध करणे सगळ्यात अवघड काम असते असे मला वाटते. कारण न्यायालयासमोर यासाठी अनेक पुरावे सादर करावे लागतात.

 विष प्रयोग करून मारल्याचे सिद्ध करण्यासाठी चार गोष्टी सिद्ध करणे आवश्यक असते. पहिले, संशयिताकडे ते विष होते. दुसरे, त्याने ते खून करण्याच्या हेतुने त्या व्यक्तीस ते दिले. तिसरे, त्या पीडित व्यक्तिने त्याचे प्राशन केले. व चौथे, त्या व्यक्तीचा मृत्यू त्यामुळेच झाला. या चार गोष्टींपैकी एक जरी बाब सिद्ध होत नसेल तर गुन्हा सिद्ध होत नाही.

 विष प्रयोग हे सिद्ध करणे म्हणजे न्याय सहाय्यक शास्त्रज्ञ व वकिलांची परीक्षाच असते.  न्याय सहाय्यक शास्त्रज्ञांनी जरी सगळे पुरावे सादर केले तरीही वकिलांना कृती मागील हेतू सिद्ध करणे हे दिव्य पार पाडावे लागते. 

 विष प्रयोग यामध्ये सर्वात जास्त प्रयोग हा किटकनाशकांचा व त्यानंतर औषधांचा होतो. बरेचदा चुकून या रासायनिक पदार्थांचे प्राशन केल्याने मृत्यू होतात. पोटॅशियम सायनाईडचा वापर भरपूर प्रमाणात होतो.

 विषप्रयोग कमी मात्रेत हळू हळू करत राहिल्याने झालेल्या मृत्यूचे कारण समजत नाही. डॉक्टर लोक अश्यावेळी एखाद्या अन्य आजाराची लक्षणे असावीत असे समजून औषध उपचार करत राहतात. विष प्राशन करून मृत्यु झाला असेल आणि शरीर कुजलेले असेल किंवा नष्ट झाले असेल तर विष बाधा लक्षात येणे कठीण होते. पोस्टमॉर्टेम खेरीज हे समजणे अशक्य होते. 

 स्ट्रीचनीन हे एक खूप विषारी रासायन आहे. पक्षी व उंदीर मारण्यासाठी त्याचा वापर होतो. याचा थोडा जास्त वेळ वास जरी घेतला तरी मृत्यू येऊ शकतो. इंजेक्शनने किंवा श्वसनाने स्ट्रीचनीन दिल्यास तीन ते पाच मिनिटात मृत्यू होऊ शकतो. तोंडावाटे स्ट्रीचनीन दिल्यास मृत्यूला अर्धा तास लागू शकतो. स्ट्रीचनीन प्रयोगाने मृत्यू खूप त्रासदायक असतो. शरीरातील सर्व स्नायू कडक होऊन शरीरात वेदना होतात. नंतर हृदय व फुप्फुस निकामी होऊन मृत्यू येतो. बर्‍याच कादंबर्‍यांमध्ये या विषाचा उल्लेख असतो.

पोटॅशियम सायनाईड फक्त पोटात गेल्याने मृत्यु होतो असे नसून ते श्वासावाटे शरीरात जाऊन मृत्यू होऊ शकतो. गुप्तहेर पकडले गेले की ते सायनाईडची गोळी खाऊन आत्महत्या करतात असे आपण ऐकले असेल. सायनाईड तात्काळ मृत्यू आणतो. 

श्रीलंकेच्या लिट्टे किंवा एलटीटीई चे आतंकवादी सभासद नेहमी आपल्या गळ्यात सायनाईडची कुपी ठेवत असत. 

१९९५ साली टोकियो मध्ये पोटॅशियम सायनाईड व सल्फ्युरिक अॅसिडच्या पिशव्या जवळजवळ ठेऊन त्या रिमोटने फोडून हायड्रोजन सायनाईडचा गॅस निर्माण करून तो भुयारी मार्गात पसरवण्याचा कट हाणून पाडला होता. २००३ साली अल कायदाने न्यू यॉर्क मध्ये असेच काही करण्याचा कट रचला होता पण तो नंतर मागे घेतला.

विष प्रयोग आत्महत्येसाठी, दुसर्‍यास मारण्यासाठी, घातपात, आतंकवाद, मोठ्या प्रमाणावर मृत्यू घडवून आणण्यासाठी केला जाऊ शकतो.

शिवाजी महाराज, संभाजी राजे, लाल बहादूर शास्त्रीजी यांच्यावर विष प्रयोग केला होता असेही म्हंटले जाते.

 

CPAG

Popular Posts