हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

मातीत मिळाले

By- Paresh Chitnis

जवळपास शंभर वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध कादंबरीकार सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांमध्ये अनेक प्रकारच्या पुराव्यांचा उल्लेख येतो. 

     फ्रेंच संशोधक एडमंड लोकार्ड यांना फ्रांसचे शेरलॉक होम्सच्या म्हंटले जायचे. त्यांचे पुराव्यांबद्दल एक सिद्धांत "लोकार्ड एक्सचेन्ज प्रिंसिपल" नावाने ओळखले जाते. "एव्हरी कॉन्टॅक्ट लिव्हस अ ट्रेस" म्हणजेच कोणत्याही दोन वस्तूंचा परस्परांशी संपर्क आला असता त्या एकमेकांवर काही ना काही छाप सोडतातच.

गुन्हे तपासणीत बऱ्याचदा घटनास्थळी बुटांचे ठसे अथवा टायर मार्क्स सापडतात. म्हणजे गुन्हेगाराचा संपर्क झालेल्या वस्तूंवर त्याच्या बोटांचे किंवा बुटांचे ठसे सापडू शकतात. तसेच घटनास्थळी असलेली माती गुन्हेगाराच्या बुटांना लागून तशीच राहू शकते. चिकटून आलेली माती किंवा कपड्यांवरची माती हा सुद्धा एक महत्वाचा पुरावा बनू शकतो.

फॉरेन्सिक सायन्स मध्ये मातीच्या परीक्षणासाठीची विशेष शाखा विकसित केली गेली. यामध्ये विशेषज्ञ मुख्यतः घटनास्थळावर सापडलेली अथवा तिथून हलवली गेलेली माती, धूळ ह्यांचे परीक्षण करतात. किंवा गुन्हेगाराच्या बुटांवर वा कपड्यांवर चिकटून आलेली माती ही गुन्ह्याच्या आसपासच्या मातीच्या प्रकारशी जुळवून त्याचा संबंध गुन्ह्याशी जोडता येतो.

मातीचे काही गुणधर्म मातीला पुरावा म्हणुन वापरण्यास महत्त्वाचे ठरतात. सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे प्रत्येक जागेची माती विशिष्ठ व वेगळी असते. मातीची ही भिन्नता आपल्याला गुन्हेगार घटनास्थळी असल्याचे सिद्ध करण्यास फार उपयुक्त ठरते.

दुसरा गुणधर्म म्हणजे माती सहजपणे ट्रान्सफर होते. तुम्ही मातीत चाललात, बसलात, पडलात किंवा तुमची वस्तू पडली तर माती बूट चप्पल कपडे किंवा कोणताही ईतर वस्तू यावर पटकन ट्रान्सफर होते. लोकार्ड एक्सचेन्ज प्रिन्सिपल प्रमाणे मातीच्या संपर्कात आलेल्या वस्तूवर माती सापडणारच. 

तिसरा गुणधर्म म्हणजे माती जिथे आहे तिथे बराच काळ राहते. बूट चप्पल कपडे टायर यावर लागलेली माती चिटकून राहते. आर्द्रतेमुळे किंवा वस्तूच्या पृष्ठ भागाच्या आकारामुळे माती जिथल्या तिथे बराच काळ राहते. 

चौथा गुणधर्म माती गोळा करणे व ईतर वस्तूंपासून विलग करणे सोपे आहे. त्यामुळे मातीचा अभ्यास करताना कमी त्रास होतो. 

पाचवा गुणधर्म माती अदृश्य असते. कपड्यांवर साचलेले मातीचे कण, म्हणजे धूळ, सुक्ष्म स्वरूपात असते. ब्रशने कपडे किंवा बूट झाडून धूळ गोळा केल्यास बर्‍यापैकी माती गोळा होऊ शकते. प्रयोगशाळेत अभ्यास करण्यापुरती लागणारी माती सहजपणे न दिसता अदृश्य पुरावा म्हणून खूप काळ टिकून राहू शकते. 

प्रयोगशाळेत मातीचा विविध प्रकारे अभ्यास केला जातो. मातीचा रंग, कणांचा आकार, ती मऊ आहे की खरखरीत आहे, त्यात ईतर जैविक पदार्थ जसे की झाडांची मुळे, कीटक व त्यांची अंडी इत्यादी आहे का या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. 

मातीतील घटकांचा अभ्यास करण्यासाठी एक्स रे डीफ्रॅक्शन चाचणी केली जाते. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून मातीतील सूक्ष्म कणांचा अभ्यास केला जातो. 

मातीत असलेल्या खनिजांचा अभ्यास केला जातो. मातीतील खनिजांमुळे मातीला चुंबकीय शक्ति प्राप्त झाली असते. प्रत्येक ठिकाणच्या मातीची चुंबकीय शक्तीची तीव्रता विशिष्ट असते. त्याची मोजणी करून दोन मातीचे नमुन्यांची तुलना केली जाऊ शकते. 

एका गुन्ह्यात संशयित व्यक्ति पोलिसांच्या तावडीतून निसटला. पोलिसांनी त्याच्या गाडी चा पाठलाग केला. त्याने रस्त्यावर गाडी सोडून दिली व नदीच्या कडेने पळून गेला. एका ठिकाणी त्याने नदी पार केली व तो तिथून पसार झाला. पोलिसांनी त्या जागेवरील मातीचे नमुने घेतले. काही तासातच एका व्यक्तीला त्यांनी शोधून काढले व त्याच्या बुटांना लागलेली माती त्यांनी मिळवली. दोन्ही नमुन्यांचा अभ्यास केला असता त्या एकाच ठिकाणच्या असल्याचे निष्पन्न झाले. 

दुसर्‍या एका प्रकरणात एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला एका निर्मनुष्य खाणीत लपवून ठेवले होते. मागितलेली रक्कम दिल्यावर त्या व्यक्तीला सोडण्यात आले. त्याच्या अंगावरील धूळीचा अभ्यास करून ती माती खनिजांचा खाणीतली आहे असे कळले. त्या जागेचा लगेच शोध लावून गुन्हेगार पकडण्यात आले. 

आज आपल्याकडे उपग्रहांचे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की. विशिष्ट घटक असलेली माती कुठे आहे हे उपग्रह शोधून सांगू शकतात. 

आजकाल बागेत कृत्रिम खडी किंवा रेती सुशोभीकरणासाठी वापरतात. एका हाय प्रोफाईल प्रकरणात संशयित व्यक्ति मयत व्यक्तीच्या घरी कधी गेलाच नाही असे म्हणत होता मात्र त्याच्या गाडीच्या टायर मध्ये अडकलेली त्याच प्रकारची कृत्रिम खडी सापडली जी घटनास्थळी होती. ती विशिष्ट खडी महाग व खास आयात केलेली होती त्यामुळे ईतर ठिकाणी कुठेच नव्हती असे समजले.

ज्याचे पुरावे कुठेच नाही मिळाले ते मातीत मिळाले आणि गुन्हेगाराचे सगळे प्रयत्न मातीत मिळाले. 

 

CPAG

Popular Posts