हा लेख वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अदृश्य पुरावे

फोरेन्सिक सायन्स बद्दल मराठी मध्ये लेख

सुतावरून स्वर्ग गाठणे

By- Paresh Chitnis

काही गुन्हे असे असतात की त्यात कोणताही मोठा पुरावा आढळून येत नाही. गुन्हा कोणी व कसा केला याची थोडी ही कल्पना येत नाही. अश्या वेळी ट्रेस एविडन्स, म्हणजे सूक्ष्म पुरावे शोधणे क्रमप्राप्त असते. घटनेच्या वेळी गुन्हेगार व पीडित यांच्यात जर झटापट झाली असेल; घटनास्थळावरून प्रेत किंवा कुठलेही पुरावे हलवले असतिल; गुन्हा करते वेळी तोडफोड झालेल्या वस्तूचे अवशेष विखुरले असतिल तर तिथे सूक्ष्म पुरावे सापडू शकतात. 

मृत व्यक्तीच्या अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त ईतर कुठल्यातरी कापडाचे तंतू जर घटनास्थळी किंवा प्रेतावर सापडले तर काही दुवा सापडू शकतो. 

केस, कापडाचे तंतू, काचेचे तुकडे, बुटांचे किंवा चपलेचे रबर सिगरेटची राख, नखाचा तुकडा, शर्टचे बटण, ग्लासात प्यायलेल्या पेयाचा थेंब, ग्लासला लागलेलं ओठांचं लिपस्टिक, पाळीव प्राण्याचे केस, विष्ठा किंवा लघवी. 

एका गुन्ह्याच्या तपासात डोक्यावर व पाठीवर कठीण वस्तूने जोरात मारून खून केला होता असे निष्पन्न झाले. संशयिताच्या गॅरेज मध्ये एक लाकडाचा तुकडा सापडला ज्यावर मृत व्यक्तिच्या टी शर्टचे तंतू अडकले होते. एवढ्याच पुराव्यावर निकाल देण्यात आला. 

टच डीएनए टेस्ट नावाची एक डीएनए चाचणी आहे. या चाचणी द्वारे अगदी सुक्ष्म प्रमाणात सापडलेल्या पुराव्यावरून व्यक्ति ची ओळख पटवता येऊ शकते. शरीराच्या सात ते आठ पेशी जरी मिळाल्या तरी ही चाचणी होऊ शकते. याला टच टेस्ट असे नाव यामुळे दिले आहे की व्यक्ति जेव्हा कुठे स्पर्श करतो तेव्हा त्याच्या त्वचेच्या पेशी तिथे सापडू शकतात. त्वचा, लाळ, केस याचे सुक्ष्म नमुने या चाचणीसाठी पुरेसे असतात. सुतावरून स्वर्ग गाठणे इथे चुकीचे ठरणार नाही. 

ही चाचणी खूप संवेदनशील असल्याने नमुना घेताना त्यात जर कुणाचा हात लागला तर चाचणी चुकते. त्यामुळे पुरावे संकलन योग्य झाल्यास अश्या प्रगत चाचण्या वापरता येऊ शकतात.

भारतात तलवार हत्या प्रकरण गाजले. या प्रकरणात पुरावे संकलन करण्यात पोलिसांनी कमालीचा हलगर्जीपणा केल्याचे हाय कोर्टाने ताशेरे ओढले. पोलिस जेव्हा घटना स्थळी पोहोचले व पुरावे गोळा करत होते तेव्हा तिथे बर्‍याच लोकांचा वावर झालेला होता व होत होता. तपासात अनेक लोकांच्या बोटांचे ठसे सापडले जे तिथे घटनेच्या नंतर आले व त्यांनी इकडे तिकडे हात लावले. ज्या कार्पेट वर रक्त सांडले होते तो कार्पेट उचलून गच्चीत नेऊन टाकला गेला. शवावर अंत्यविधी करून घराची साफसफाई करण्यात ही कमालीची घाई करण्यात आली. प्रमुख संशयित सापडत नसतानाही घराच्या गच्चीची तपासणी केली गेली नाही. नंतर संशयिताचे शव गच्चीत सापडले. मात्र तोवर घरात पूर्ण स्वच्छता केल्याने अधिक पुरावे शोधताच आले नाहीत. तपास करणाऱ्यांच्या तपासात व जबाबात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे असलेल्या पुराव्यांवर ही शंका घेतल्या गेल्या. 

पुराव्या अभावी हाय कोर्टाने निकाल अनिर्णित ठेवला. सुप्रीम कोर्टाने तलवार दाम्पत्यास दोषी ठरवले. मात्र बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले. सुक्ष्म पुराव्याचे नमुने योग्य पद्धतीने घेतले असते तर कदाचित कमी वेळात योग्य न्याय करता आला असता. 

 

 

CPAG

Popular Posts